उरणच्या ओएनजीसी गॅस प्लँटमध्ये अग्नितांडव; पाच जणांचा मृत्यू झाल्याची भीती


एएमसी मिरर : वेब न्यूज
उरण येथील ओएनजीसीच्या गॅस प्लँटमध्ये भीषण आग लागली. सकाळी सात वाजेच्या सुमारास आग लागल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
लिक्विड गळतीमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती असून, या आगीत होरपळल्याने तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, प्लँटमध्ये काही कामगार अडकले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर जखमी कामगारांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. प्लँटमधून धूराचे लोळ बाहेर पडत असून परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आगीची भीषणता लक्षात घेऊन प्रशासनाने परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू केले आहे. त्याचबरोबर ओएनजीसीच्या या प्रकल्पासून एक किलोमीटरपर्यंत नागरिकांना प्रवेश बंद केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post