'अजित पवारांनी राजीनामा दिला तरी कारवाई थांबणार नाही'


एएमसी मिरर : वेब न्यूज 
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांसह भाजपच्या नेत्यांनाही अजित पवारांच्या निर्णयाचा धक्का बसला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अजित पवारांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देतांना मात्र, अजित पवारांना टोला लगावलाय.
विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना अजित पवारांनी राजीनामा दिल्यामुळे मला आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे याची त्यांच्या घरच्यांना देखील माहिती नाही. अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्यावरील कारवाई थांबणार नाही, असे गिरीश महाजन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रितेय म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post