मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या हर्षवर्धन पाटलांचा भाजप प्रवेश


एएमसी मिरर : वेब न्यूज
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या भाजपप्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. उद्या दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपप्रवेश होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून ते भाजपत जाणार असल्याची चर्चा होती. अखेर ती वेळ आली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाला कंटाळून ते भाजपत जात असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर हर्षवर्धन पाटील यांनी पुन्हा इंदापूरची जागा आपल्याला हवी म्हणून आग्रह धरला होता; परंतु पक्षाने यावर कोणताही तोडगा काढला नसल्याने हर्षवर्धन पाटील पक्षावर नाराज आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी गेल्या आठवड्यात कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेत पक्षप्रवेशाबाबत कौल घेतला होता. तसेच सभेनेही त्यांना भाजपमध्ये जाण्याचा कौल दिला होता. त्यांनीही हा कौल मान्य करून भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार हर्षवर्धन पाटील उद्या भाजपत जाहीर प्रवेश करणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post