एएमसी मिरर : वेब न्यूज
देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या लक्ष्याकडे वाटचाल करत असताना शहरांची निर्मितीही २१ व्या शतकातील जगाप्रमाणे करावी लागणार असल्यामुळे पुढील पाच वर्षांत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरवर १०० लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे सांगितले. मुंबईतील तीन नव्या मेट्रो मार्गिकांच्या भूमिपूजनावेळी ते बोलत होते.
सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा
संघ टिळक मंदिरात बाप्पाचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी मेट्रोच्या तीन
मार्गिकांचे भूमिपूजन केले. गायमुख-शिवाजी चौक (मिरा रोड) मेट्रो १० (९.२
किलोमीटर), वडाळा-सीएसटी मेट्रो ११ (१२.८ किलोमीटर) आणि कल्याण-तळोजा
मेट्रो १२ (२०.७) या प्रकल्पांचा समावेश आहे. यावेळी पंतप्रधान मोदींच्या
हस्ते मेट्रो कोचचेही उद्घाटन करण्यात आले.
Post a Comment