एएमसी मिरर : वेब न्यूज
पाच वर्षात केलेल्या दहा टक्के काम जरी माझ्या विरोधात उभे राहणाऱ्या उमेदवाराने केले असल्यास मी निवडणुकीतून जाहीर माघार घेईन, असे आव्हान राज्य नियोजन कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी रविवारी झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात दिले. भाजप व शिवसेनेची युती होणार असून राज्यात २५० पेक्षाअधिक जागा निवडून येतील. आपणही विजयाची हॅट्रिक करणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
केशवराव भोसले नाट्यगृहात लक्ष विधानसभा २०१९ अहवाल प्रकाशन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी झालेली निवड आणि खा. संजय मंडलिक यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात आ. क्षीरसागर यांनी उत्तरमधून निवडणुकीचे रणशिंग फुंकले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भानुदास यादव महाराज होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेतील सहभागामुळे मंत्री पाटील अनुपस्थित होते. भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी मंत्री पाटील यांच्यावतीने सत्कार स्विकारला.
ठरलेले उत्तरचे उत्तर आम्ही दक्षिणेत पाठविले आहे. त्यामुळे दक्षिणेत आमचा वेगळा निर्णय असला तरी उत्तरमध्ये आ. क्षीरसागर यांच्यासोबत असू, असे माजी नगरसेवक सुनिल मोदी यांनी सांगितले. त्यावर ऋतूराज क्षीरसागर यांनी आ. क्षीरसागर हेच उत्तरचे उत्तर आहेत, असे प्रत्युत्तर दिले. खा. मंडलिक यांनी जिल्ह्यात दहापैकी दहा जागा युतीच्या निवडून येतील. मात्र एखादी जागा जावू शकते, असे सुचक विधान केले. खासदारांचा रोख दक्षिणेत असल्याची कूजबूज सभागृहात सुरू होती.
Post a Comment