संकटग्रस्त आयडीबीआय बँकेला आर्थिक साहाय्य


एएमसी मिरर : वेब न्यूज
देशातील सरकारी बँका भीषण आर्थिक संकटात आहेत. यामुळे केंद्र सरकार त्यांना आर्थिक मदत करीत आहे. त्यातीलच खासगीकरणाच्या वाटेवर असणाऱ्या आयडीबीआय बँकेला मोठा निधी देण्यात आला आहे.
आयडीबीआय बँकेला ९,३०० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घोषित केला आहे. या बँकेचा भांडवली पाया बळकट करणे व पर्यायाने तिला नफ्यात आणणे या उद्देशाने हा निधी देण्यात येणार आहे.
या बँकेचा भांडवली पाया बळकट करणे व पर्यायाने तिला नफ्यात आणणे या उद्देशाने हा निधी देण्यात येणार आहे. यातील ४,५५७ कोटी रुपये केंद्रातर्फे तर ४,७४३ कोटी रुपये एलआयसीतर्फे (भारतीय आयुर्विमा महामंडळ) दिले जातील.
या सरकारी मदतीमुळे आयडीबीआयच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन या बँकेला स्वत:हून स्वत:च्या भांडवलात वाढ करता येईल व त्यामुळे रिझर्व्ह बँकेने घातलेल्या आर्थिक निर्बंधांतून ती बाहेर पडेल, असा सरकारला विश्वास आहे. पुनर्भांडवली रोख्यांच्या (रीकॅप बॉण्ड्स) माध्यमातून हे अर्थसाह्य केले जाणार असून यामुळे बँकेच्या तरलतेवर अथवा अर्थसंकल्पी तरतुदींवर काहीच परिणाम होणार नाही, असे जावडेकर यांनी सांगितले. एलआयसीचा या बँकेत ५१ टक्के भांडवली हिस्सा आहे. चालू वर्षाच्या सुरुवातीस ही प्रक्रिया पूर्ण झाली होती.

Post a Comment

Previous Post Next Post