मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या ताफ्यावर शाईफेक


एएमसी मिरर : नगर
महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या ताफ्यावर शाई फेकण्याचा प्रकार अकोले येथे घडला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शर्मिला येवले यांनी हा प्रकार केल्याची माहिती आहे.


अकोले येथे सकाळी साडेअकरा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभा संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा निघालेला असताना त्यांच्या ताफ्यावर शाई फेक करण्यात आली. नुकतेच राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केलेल्या आमदार वैभव पिचड यांना भाजपने तिकीट देऊ नये, तसेच लोकोपयोगी असलेले महा पोर्टल चालू करावे, या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाई फेकण्यात आल्याचे समजते. घटनेनंतर यात्रेच्या सुरक्षितेत  वाढ करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post