जळगाव : घरकुल खटल्यातील सरकारी वकिलांचा राजीनामा


एएमसी मिरर : वेब न्यूज 
राज्यभर गाजलेल्या घरकुल खटल्यात अलीकडेच नेमण्यात आलेले विशेष सरकारी वकील ॲड. अमोल सावंत यांनी राजीनामा दिला आहे.
अलीकडेच आरोपींच्या जामिनावरील सुनावणीच्या वेळी ॲड.सावंत यांना न्यायालयाने फटकारले देखील होते. दरम्यान सावंत यांनी नियुक्ती झाल्यानंतर अण्णा हजारे यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती तर माध्यमांनी देखील ॲड.सावंत यांचे नियुक्तीचे प्रकरण लावून धरले होते. तसेच माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केली होती दरम्यान सावंत यांचा राजीनामा शासनाने स्वीकार केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post