दहशतवादी हल्ल्यात लहान मुलीसह चार नागरिक जखमी


एएमसी मिरर : वेब न्यूज
सोपोरे जिल्ह्यात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात एका लहान मुलीसह चौघे जखमी झाले आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्विट करत माहिती दिली.
पोलिसांनी म्हटले आहे की, “दहशतवाद्यांचं हे निर्दयी कृत्य आहे. दहशतवाद्यांनी सोपोरमधील डांगेरपोरा येथे गोळीबार केला असून यामध्ये लहान मुलगी उस्मा जान हिच्यासहित चौघे जखमी झाले आहेत. ”
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. पोलीस घटनास्थळी उपस्थित असून तपास सुरू आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलीस प्रवक्त्याने दिली.
याआधी २९ ऑगस्ट रोजी काही संशयित दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील परिमपोरा परिसरात गोळीबार करत एका नागरिकाला जखमी केलं होतं. नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी दहशतवादी हे हल्ले करत असल्याचं गुप्तचर यंत्रणांनी म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post