एएमसी मिरर : वेब न्यूज
आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे मुंबईतील ईडीच्या कार्यालयात पोहचणार आहेत. त्यामुळे ईडीसमोरच मोठा पेच निर्माण झाला आहे. शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आव्हानही केले आहे. मात्र, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची माफी मागत 'ईडी'वर धडकणारच असे म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी यांदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. माफ करा, या वेळेस पहिल्यांदा आम्ही तुमचं नाही ऐकणार. तुमच्या महाराष्ट्र घडवतानाच्या वेदना आम्ही बघितल्या आहेत. कर्क रोग, मांडीच्या हाडाचं ऑपरेशन, पायाला झालेली इजा, तरी तुम्ही लढताय, वय वर्ष 79, हे सगळे तुम्ही आमच्यासाठी सोसलंय, उद्यासाठी माफ करा, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.
दक्षिण मुंबईत जमावबंदी
शरद ईडीच्या कार्यालयात पोहोचणार आहे. परंतु ‘ईडी’ त्यांना कार्यालयात प्रवेश नाकारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी कुलाबा, कफ परेड, मरीन ड्राइव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जे. जे. मार्ग, एमआरए मार्ग या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश दिले आहेत.
Post a Comment