एएमसी मिरर : नगर
कर्नलच्या घरातून 20 हजार रुपयांचा मोबाईल लंपास पळविण्यात आला
तर दुसर्या घटनेत बँकेतून 39 हजार रुपयांची रोकड असलेली बॅग लंपास करण्यात
आली. या प्रकरणी भिंगार पोलिसात दोन वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात
आल्या आहेत.
लेफ्टनंट नवतेज सिंग सिद्धू यांचा मोबाईल भामट्याने लंपास केला. एसीसी स्कुलमध्ये ते नोकरीत असून लांगर कंपलेक्समधील 20 नंबर खोलीत ते राहतात. गुरूवारी घरातून त्यांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल भामट्याने पळविला. दुसरी घटना स्वस्तिक चौकातील अॅक्सिस बँकेत घडली. दिनकर विक्रम जवरे यांची 39 हजार रुपयांची रोकड असलेली बॅग चोरट्याने लंपास केली. जवरे रायटर सेफ गार्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत नोकरीला असून ते मुळचे पाथर्डी येथील माळेवाडीचे आहेत. नगरमधील भोसले आखाड्यात ते राहतात. गुरूवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास ते स्वस्तिक चौकातील अॅक्सिस बँकेत आले होते. कॅश काऊंटरच्या बाजूला असलेल्या बाकड्यावर त्यांनी 39 हजार 170 रुपयांची रोकड असलेली बॅग ठेवली. नजर चुकवून चोरट्याने रोकड असलेली सॅक लंपास केली.

Post a Comment