बिबट्याच्या हल्ल्यात 9 वर्षीय मुलाचा मृत्यू


एएमसी मिरर : नगर
श्रीरामपूर तालुक्याच्या विविध भागात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असतानाच, कुरणपूर येथे 9 वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. दर्शन चंद्रकांत देठे असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्री 8.45 घडली. बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करावा, या मागणीसाठी व वन अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ सहा गावातील ग्रामस्थांनी कुरणपूर-फत्याबादमध्ये रास्तारोको करण्याचा इशारा दिला आहे.
रस्त्याच्या कडेला असलेल्या उसाच्या शेतातून बिबट्या अचानक बाहेर आला, अन् कुणाला काही कळण्याचा आत त्याने दर्शन याच्यावर हल्ला करून त्याला शेतामध्ये जवळपास ओढत नेले. अश्विनी देठे हिने आरडाओरड केल्यानंतर नागरिक, तरुणांनी धाव घेतली. उसामध्ये मुलाचा शोध घेऊन त्वरित प्रवरा रुग्णालयात नेले. पण रुग्णालयात पोहोचल्यानंतर तेथील डॉक्टरांनी दर्शनचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
दरम्यान, बेलापूर-कोल्हार रोडवरील ताके वस्तीनजीक एकाच वेळी 5 बिबटे निदर्शनास आल्याची चर्चा असून यामुळे परिसरात घबराट पसरली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post