वंचित-एमआयएममध्ये उभी फूट; एमआयएम स्वबळावर लढणार


एएमसी मिरर : वेब न्यूज
गेल्या लोकसभा निवडणुकीत एकजुटीचा नारा देत सत्ताधाऱ्यांना घाम फोडणाऱ्या वंचित बहुजन आघाडी व एमआयएम मध्ये फूट पडली आहे. जागा वाटप व्यवस्थित होत नसल्याने आम्ही स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा एम आयएम नेते इम्तियाज जलील यांनी केली.
एमआयएमने वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे ९८ जागांची मागणी केली होती. पुढे त्यात बदल करून किमान ७४ जागा तरी द्याव्यात, अशी विनंती केली होती. पण दोन वेळा चर्चा होऊनही जागांबाबतचे निर्णय होऊ शकला नव्हता. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्यात दोनवेळा बैठका झाल्या, तर खासदार इम्तियाज जलील यांच्याबरोबर तीन बैठका झाल्या. जागा वाटपाचा तिढा न सुटल्यामुळे एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीत काडीमोड होण्याची शक्यता वर्तविली जात होती.

Post a Comment

Previous Post Next Post