युतीमध्ये कोणतेही ‘विघ्न’ येणार नाही : सुधीर मुनगंटीवार


एएमसी मिरर : वेब न्यूज 
आगामी विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेसाठीही भाजप आणि शिवसेना युती करणार असल्याचा दावा भाजप नेत्यांतर्फे करण्यात येत असून युतीमध्ये कोणतेही विघ्न येणार नाही, असा विश्वास राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
गणेशाची आगमनानंतर लवकरच युतीसंदर्भातील चर्चाही पूर्णत्वास येणार आहे . युतीचा फॉर्म्युला हा भाजप अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील चर्चेतूनच समोर येईल. विधानसभेच्या २८८ जागा भाजप -शिवसेना युतीतर्फे लढवण्यात येतील. इतकेच नाही तर जागा वाटपासंदर्भातील चर्चेतून सकारात्मक निर्णय घेतले जातील, असा विश्वासही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. शिवसेनेसह रामदास आठवले यांच्या रिपाइं आणि महादेव जानकर यांचा रासप पक्ष आमच्यासोबत हातमिळवणी करणार असल्याचेही ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post