एएमसी मिरर : नगर
महापालिकेच्या नगररचना विभागात 24 वर्षांपासून एकाच पदावर असलेल्या अभियंता के. वाय. बल्लाळ यांच्या बदलीसाठी शिवसेना नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी थेट नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना साकडे घातले आहे. आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्यासोबत त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यांची त्वरित नगररचना विभागातून दुसऱ्या विभागात बदली करावी, तसेच त्यांच्याकडील संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेना बोराटे यांनी केली आहे.
1995 पासून कार्यरत असलेले अभियंता बल्लाळ आणि आयुक्त भालसिंग यांचे घनिष्ठ संबंध आहेत. काही ठराविक विकसक आणि बिल्डर यांना हाताशी धरून ते चुकीच्या पद्धतीने काम करत आहे. गेल्या 24 वर्षांपासून ते नगररचना विभागात एकाच पदावर कार्यरत आहेत. त्यांची बदली का होत नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. नगर शहरातील नागरिकांची कामे या एका अधिकार्यामुळे खोळंबली आहेत, असा आरोपही बोराटे यांनी निवेदनात केला आहे.
Post a Comment