एएमसी मिरर : नगर
कत्तलची रात्र मिरवणूक मार्ग व मोहरम विसर्जन मिरवणूक मार्गावरील
विविध प्रकारची अतिक्रमणे हटविण्याची धडक मोहीम महापालिकेने शनिवारी (दि.7)
सकाळपासून राबविण्यास सुरुवात केली. दुपारपयर्र्ंत बहुतांशी अतिक्रमणे
हटविण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग अधिकारी अंबादास सोनवणे, अशोक साबळे, क्षेत्रीय अधिकारी विजय बोधे, सुरेश मिसाळ, गणेश येगे व कर्मचार्यांनी ही मोहिम राबविली. जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधु यांनी पोलिस अधिकार्यांच्या पथकासह शुक्रवारी मोहरम विसर्जन मिरवणूक मार्ग, कत्तलची रात्र मिरवणूक मार्ग व गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केली होती त्यावेळी या मार्गांवर अनेक ठिकाणी विविध प्रकारची अतिक्रमणे असल्याचे आढळून आले होते.
तसेच काही ठिकाणी वाळू, विटा, खडी, यासारख्या बांधकाम साहित्याचे ढिगारेही टाकण्यात आलेले होते. यामुळे मिरवणुकीला अडथळा निर्माण होणार होता. ही अतिक्रमणे व विविध प्रकारची अडथळे तातडीने हटविण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले होते. त्यानुसार शनिवारी सकाळपासूनच महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने धडक मोहीम राबविली आहे.

Post a Comment