सोमवारी मुंबईत मनसेचा मेळावा, राज ठाकरेंच्या घोषणेकडे लक्ष


एएमसी मिरर : वेब न्यूज
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात राज ठाकरे काय घोषणा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबईतील वांद्रे या ठिकाणी असलेल्या एमआयजी क्लब येथे हा मेळावा घेतला जाणार आहे. राज ठाकरे या मेळाव्यात सगळ्या इच्छुक उमेदवारांसही संवाद साधतील असे सांगितले जात आहे.
मनसे 100 जागा लढवणार अशी चर्चा काही दिवसांपासून सुरु आहे. त्याबाबत राज ठाकरे यांनी कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही

Post a Comment

Previous Post Next Post