महाराष्ट्र नवनिर्माण विनाधानसभा लढवणार की नाही? यावरून चर्चा सुरू होती. मात्र, आता मनसे निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित झाले आहे, असे सांगितले जात आहे. आज (ता.२०) राज ठाकरे यांच्या निवासस्थानी झालेल्या मनसे नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची सूत्रांनी माहिती दिली.
मनसे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक इत्यादी ठिकाणी ताकद असलेल्या शहरांमध्ये निवडणूक लढवणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रात्री किंवा उद्या सकाळी अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. राज यांनी आजच्या बैठकीतून नेत्यांना दिली प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी वाटून दिली आहे.
Post a Comment