मोदी राष्ट्रपित्यासारखे महान नेते : ट्रम्प


एएमसी मिरर : वेब न्यूज 
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान रॉकस्टार एल्विस प्रेस्लेंसारखे लोकप्रिय आहेत. नेता म्हणून मोदी मला खूप आवडतात. ते भारताच्या राष्ट्रपित्यासारखेच महान नेते आहेत, या शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींची स्तुती केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज न्यूयॉर्कमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी बोलताना ट्रम्प यांनी मोदींचा मुक्तकंठाने गौरव करताना त्यांना भारताचे राष्ट्रपिताही म्हटले. मोदींसोबत त्यांनी मनमोकली चर्चा केली.
आम्ही दोघे मिळून इस्लामिक दहशतवादाविरोधात लढा देणार आहोत, असं सांगतानाच भारत आणि पाकिस्तान द्विपक्षीय चर्चेतूनच त्यांचे अंतर्गत वाद सोडवू शकतात, असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.
मोदी दहशतवादाचा मुद्दा सोडवतील असा विश्वास व्यक्त करताना ट्रम्प म्हणाले की मोदींनी दहशतवादाविरुद्ध पाकिस्तानला कडक संदेश दिला आहे. पाकिस्तान मोदींचा हा संदेश जरूर ऐकेल अशी अपेक्षा आहे. भारतासोबत लवकरच उद्योग करार करू, असेही ट्रम्प म्हणाले.
मोदींनीही ट्रम्प यांची स्तुती केली. ट्रम्प हे केवळ माझेच मित्र नाही, संपूर्ण भारताचेही मित्र आहेत. भारत आणि अमेरिकेची मैत्री आता आणखी दृढ होईल. अमेरिकेसोबत ६० अब्जाचा करार करण्यात येणार आहे. दोन्ही देश वेगाने प्रगती करत आहेत, असे मोदी म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post