दहशतवादाचा सामना एकत्रितपणे करू; मोदी-ट्रम्प यांचा पाकला इशारा


एएमसी मिरर : वेब न्यूज
भारत आणि अमेरिका इस्लामिक दहशतवादाविरुद्धची लढाई एकत्रितपण लढतील, अशी ग्वाही पंतप्रधान नरेन्द्र मोदी अमेरिकेचे राष्टध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘हाऊडी मोदी ‘ कार्यक्रमात दिली. कुणाचेही नाव न घेता मोदी आणि ट्रम्प यांनी पाकिस्तानला यातून ‘योग्य’ संदेश दिला.
भारत हा अमेरिकेचा सर्वात विश्वासू मित्र आहे. राष्टध्यक्ष म्हणून मी पुन्हा निवडून आलो तर भारताला चांगला मित्र मिळेल, या शब्दात ट्रम्प यांनी भविष्यातही भारताला पाठिंबा देण्याचा संकेत दिला.
दोन्ही देश सुरक्षेवर एकत्रित काम करत असून भारत आणि अमेरिका इस्लामिक दहशतवादाचा मुकाबला करण्यास सज्ज आहे, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. तर दहशतवादाविरोधात आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांच्या विरोधात निर्णायक लढाई लढण्याची वेळ आली आहे. या लढाईत अध्यक्ष ट्रम्प दहशतवादाविरोधात उभे आहेत, असे मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता सांगितले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ अमेरिकेच्या ह्युस्टनमध्ये हाऊडी मोदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ट्रम्प यांनी मोदींची मुक्तकंठाने स्तुती केली. मोदींच्या नेतृत्वात भारत मजबूत होत आहे. मोदी सरकारने भारतातील ३० कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्याबाहेर काढण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एक सशक्त देश म्हणून जग भारताकडे पाहते. अमेरिका आणि भारताच्या संविधानाची सुरुवात ‘वुई द पीपल्स’ने होते; दोन्ही देशांमध्ये हा समान धागा आहे, असे ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प पुढे म्हणाले मोदींसोबत मला या मंचावर उपस्थित राहण्याची संधी मिळाली, हे सुद्धा माझं भाग्य आहे. आपल्या सर्वांचं स्वप्न एकच आहे. अनिवासी भारतीयांचा आम्हाला अभिमान आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या नव्या संरक्षण करारावर लवकरच निर्णय होईल. भारतासोबत मिळून आम्ही इस्लामिक दहशतवादाचा मुकाबला करू.

मुंबई भेटीला येऊ का?
मोदी आणि ट्रम्प यांचा वागण्या – बोलण्यातला मोकळेपणा हे या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले. पुढच्या वर्षी मुंबईत बास्केट बॉल स्पर्धा होणार आहे. त्यासाठी हजारो लोक मुंबईत येणार आहे. पीएम मोदीजी, मी हा खेळ पाहण्यासाठी मुंबईत येऊ का? तुम्ही बोलावलं तर मी येऊ शकतो, असे मिश्कीलपणे ट्रम्प म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post