कत्तलची रात्र मिरवणुकीत टारगटांना पांगविण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर


एएमसी मिरर : नगर
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या नगरच्या मोहरम मिरवणुकीत गोंधळ घालणार्‍या टारगटांना पांगविण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला. कोठला परिसरात सोमवारी (दि.9) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, यावेळी टारगटांच्या पळापळीमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
कोठला येथून छोटे इमाम यांची सवारी बाहेर पडल्यानंतर राज चेंबर परिसराकडे येत असतांना  काही टारगट युवकांकडून गोंधळ घालण्यास सुरूवात झाली. पळापळ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिसांन त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, काही युवकांनी पोलिसांपुढे येवून हुज्जत घालण्याचाही प्रयत्न केला. यावेळी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी टागरटांवर सौम्य लाठीमार करुन व बळाचा वापर करुन त्यांना पांगविले. गोंधळ घालणार्‍या काही टारगटांनाही त्यांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान, पोलिसांकडून बळाचा वापर सुरू झाल्यामुळे परिसरात चांगलीच पळापळ झाली. त्यामुळे काही काळ तणावही निर्माण झाला होता. पोलिसांनी बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणत सवारी मार्गस्थ केल्यानंतर तणाव निवळला.

Post a Comment

Previous Post Next Post