आपण ‘देखणा माणूस’ असा शब्द वापरला : सुजय विखे


एएमसी मिरर : नगर
साकळाई पाणी योजनेबाबत बोलताना खासदार डॉ. सुजय विखे यांनी ‘देखणा माणूस आला तर त्याला पाहायला जायला पाहिजे’ असं विधान केले होते. यावर अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी संताप व्यक्त करत विखे यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं म्हटले होते.विखे यांनी याविषयी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी गुंडेगाव येथील भाषणात बोलताना आपण ‘देखणा माणूस’ असा शब्द वापरला आहे. देखणी महिला किंवा स्त्री असा शब्द प्रयोग नाही. त्यामुळे अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी गैरसमज करून घेऊ नये. मी त्यांना उद्देशून मुळीच बोललो नव्हतो, तरीही त्यांना तसे वाटत असेल तर मी माझे शब्द मागे घेतो, असं विखे यांनी म्हटले आहे. एवढ्या वर्षांच्या राजकारणात माझ्यावर किंवा आमच्या कुटुंबावर संस्कार नाहीत, असा आरोप कधीच झाला नाही, असेही विखे म्हणाले .
अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पत्रकारांशी बोलतांना विखे यांच्या वक्तव्याबद्दल संताप व्यक्त केला होता. विखे हे सुसंस्कारित घराण्यातील आहेत. ते डॉक्टर व खासदार आहेत. माझ्या अनुषंगाने त्यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. त्यांनी माफी मागावी अन्यथा आपण महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी म्हटले होते.

Post a Comment

Previous Post Next Post