राज्यातील गडकिल्ले लग्न समारंभ, हॉटेलिंगसाठी मिळणार भाडेतत्वावर

 
एएमसी मिरर : वेब न्यूज
लग्नसमारंभ, हॉटेलिंग यासाठी राज्यातले गडकिल्ले आता भाडेतत्वावर मिळण्याची शक्यता आहे. एमटीडीसीच्यावतीने यासाठी राज्यातील 25 किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे. निवड केलेले 25 किल्ले 60 ते 90 वर्षांच्या भाडेतत्वावर देण्याचा सरकारचा मानस आहे. पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढावी यासाठी राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे. स्थानिक पर्यटकांमध्ये हेरिटेज टुरिझम अर्थात गडकिल्ले, ऐतिहासिक वास्तू यांचे पर्यटन वाढले आहे. पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढवण्यासाठी किल्ल्यांचे रुपांतर हेरिटेज हॉटेलमध्ये करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. महाराष्ट्रातील गड किल्ले हेरिटेज हॉटेलियर्स आणि हॉस्पिटॅलिटी चेन्सना भाडेतत्त्वावर दिले जाणार आहेत.
या किल्ल्यांना भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाबाबत राज्य मंत्रिमंडळाने 3 सप्टेंबर रोजी निर्णय घेतला होता. संरक्षित स्मारकांच्या यादीमध्ये नसलेले आणि सरकारी जमिनीवर नसलेले राज्याच्या मालकीचे किल्ले भाड्याने देण्यास या नवीन धोरणांतर्गत एमटीडीसीला मंजुरी मिळाली आहे. दरम्यान या निर्णयाचा खा. सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे, आ. जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर निषेध केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post