मुंबई, ठाणे, रायगडमध्ये रेड अलर्ट


एएमसी मिरर : वेब न्यूज 
येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  हवामान विभागाकडून सकाळी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. मात्र काही काळाने तो वाढवून आता रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाबेर पडण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
पावसाची स्थिती लक्षात घेत मुंबई, ठाणे आणि कोकणातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ही घोषणा केली. तसेच सकाळच्या सत्रातील शाळेतले विद्यार्थी सुखरुप घरी पोहोचतील याची खबरदारी शाळांनी घ्यावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
मुंबईसह उपनगरात होणाऱ्या जोरदार पावसामुळे मुंबईतल्या हिंदमाता, दादर, सायनच्या सखल भागात काही काळ पाणी साचलं आहे. ठाणे स्थानकाच्या दोन्ही एन्ट्री पॉईंटला पाणी साचलं आहे. मुंबईसह ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, वसई, दादर आणि पालघर या भागात पावसाचा जोर कायम आहे. पाऊसाचा जोर जर असाच चालू राहिला मुंबईकरांना हाल सहन करावे लागणार आहे. या पावसामुळे रेल्वेसहित रस्त्यावरील वाहतूकही मंदावली आहे. वेस्टर्न आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक संथगतीने सुरु आहे.

Post a Comment

Previous Post Next Post