नगर : ट्रक व कारच्या अपघातात चार जण जागीच ठार


एएमसी मिरर : नगर
नगर-दौंड रस्त्यावर बाबुर्डी बेंद परिसरात ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. बाबुर्डी बेंद परिसरातील महादेव वस्तीजवळ गुरुवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
ट्रक (एमपी 09 एचएच 8378) व कार (एम एच 04 बिवाय 4857) यांच्यात भीषण अपघात झाला. अपघातात नगर जवळील भिंगारचे तीन, तर नगर तालुक्यातील वाळकी येथील एकजण ठार झाल्याचे समजते. कार श्रीगोंद्याहून नगरकडे येत असताना हा अपघात झाला असे सांगितले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post