नगर तालुका दूध संघासाठी ३० ऑक्टोबरला मतदान


एएमसी मिरर : नगर
मागील १४ वर्षांपासून बंद असलेल्या नगर तालुका सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघाच्या निवडणुकीचे ढोल वाजले आहेत. संघाच्या संचालक पदासाठी ३० ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीमुळे नगर तालुक्याचे राजकारण पुन्हा पेटणार आहे.
जिल्हा दूध संघाचे विभाजन झाल्यानंतर नगर तालुका सहकारी दूध संघ अस्तित्वात आला. या संघात सुमारे दोन कोटींचा आर्थिक असमतोल होऊन संघातील घोटाळा उघडकीस आला. यानंतर २००५ च्या काळात तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. दूध संघावर प्रशासक नेमण्यात आला. मात्र, दूध व्यावसायिक व कर्मचारी यांचे वेतन थकल्याने मोठी आंदोलने झाली. त्यानंतर हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय समिती नेमण्यात आली. यानंतरही संघाचा आर्थिक असमतोल ढासळत राहिला. संघ अवसायनात गेला. पुन्हा संघाला पुर्नजिवित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. संघाच्या १५ संचालक मंडळासाठी सहायक निंबधक सहकारी संस्था (दुग्ध) यांनी नुकतीच निवडणूक जाहीर केली असून, यासाठी ३७ मतदार प्रतिनिधी आहेत. ऐन दिवाळीच्या धामधुमीत दूध संघाची निवडणूक होणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

उमेदवारी अर्ज दाखल करणे : २४ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर

छाननी : ३० सप्टेंबर

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक : ३ ते १७ ऑक्टोबर

चिन्ह वाटप : १८ ऑक्टोबर

मतदान : ३० ऑक्टोबर

मतमोजणी : ३० ऑक्टोबर (मतदान संपल्यानंतर)

ठिकाण : एमआयडीसी

Post a Comment

Previous Post Next Post