नगर : ‘टंचाई’चे ‘आपत्ती’मध्ये रुपांतर


एएमसी मिरर : नगर
जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाई शाखेचे नामकरण करण्यात आले आहे. टंचाई शाखा यापुढे आता आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन शाखा म्हणून ओळखली जाणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी काढले आहेत.
शासनाच्या अधिसूचनेनुसार कार्यनियमावलीत सुधारणा करण्यात आली आहे. महसूल व वन विभागाला नेमून दिलेल्या मदत व पुनर्वसन विभागाचे रुपांतर आता आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग असे करण्यात आले आहे. या आदेशानुसार जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी टंचाई शाखेच्या रुपांतराबाबत आदेश बजावले असून, टंचाई शाखा यापुढे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन शाखा म्हणून ओळखली जाणार आहे. शासकीय पत्रव्यवहारही बदललेल्या नावानुसारच करण्यात यावेत, असेही त्यांनी सूचित केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post