नारदा स्टिंग ऑपरेशन : सीबीआयकडून आयपीएस अधिकाऱ्याला अटक


एएमसी मिरर : वेब न्यूज
पश्चिम बंगालमधील नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणी सीबीआयने आयपीएस अधिकारी सय्यद मोहम्मद हुसेन मिर्झा यांना अटक केली आहे. नारद स्टिंग ऑपरेशन प्रकरणी करण्यात आलेली ही पहिली अटक आहे.

या प्रकरणात काही तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचीही नावे आहेत. या प्रकरणी प्राथमिक तपास पूर्ण झाल्यानंतर सीबीआयने टीएमसीचे तत्कालीन राज्यसभा खासदार मुकूल रॉय, लोकसभा खासदार सौगत रॉय आणि माजी आमदार मदन मिश्रा यांच्यासारख्या पश्चिम बंगालमधील मोठ्या नेत्यांवर गुन्हेगारी कट आखण्याचा तसंच भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. मुकूल रॉय सध्या भाजपात गेले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post