सुरुवात त्यांनी केली शेवट आम्ही करणार : अजित पवार

पवार म्हणाले, अनेकांनी पक्षांतर केल्याने सध्या महाराष्ट्रात गोंधळाचे वातावरण आहे. त्यामुळे कोणाला कुठून उमेदवारी मिळेल हे अत्ताच निश्चितपणे सांगता येणार नाही. मित्र पक्षातील राजू शेट्टी, कवाडे, अबू आझमी यांना आघाडीबरोबर घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे चर्चा करणार आहेत. त्यानंतर येत्या २ ऑक्टोबरला आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, तेव्हाच कोणाला कुठली उमेदवारी मिळेल हे स्पष्ट होईल.
यावेळी वरळीतील शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आघाडीचा उमेदवार देणार अशी घोषणाही अजित पवार यांनी केली. तसेच वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडून स्वगृही भाजपात परतलेले गोपीचंद पडळकरांचे बारामतीतील आव्हान त्यांनी स्विकारले. काट्यानं काटा काढणार असे म्हणत बारामतीत आघाडीची ताकद दाखवून देऊ असे सांगताना बारामतीतील आघाडीचा उमेदवार १ लाख मतांनी निवडून येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post