माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने अजित पवार अस्वस्थ : शरद पवारएएमसी मिरर : वेब न्यूज 
अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला ही बातमी मला पुण्याला येताना समजली. या संदर्भात मला कोणतीही कल्पना नव्हती. मी त्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना संपर्क साधला. अजित पवार यांच्या मुलांशी चर्चा झाली. त्यावेळी काकांवर गुन्हा दाखल झाल्याने मी अस्वस्थ आहे, असे अजित पवार यांनी मुलांना सांगतिले. त्याचमुळे त्यांनी राजीनामा दिला असावा, असे मला वाटते आहे, असे शरद पवार यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
“अजित पवार त्यांच्या मुलांना म्हणाले की, शिखर बँक घोटाळा प्रकरणात ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या सगळ्या घडामोडींना मी तोंड देतो आहे. मात्र यात काकांचं  म्हणजे माझं नाव आल्याने अस्वस्थ झालो.” असं अजित पवारांनी सांगितल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.
अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्याशी चर्चा केली. सध्या इतक्या खालच्या पातळीचं राजकारण सुरु आहे की आपण राजकारणात न राहिलेलं बरं. आपण शेती किंवा व्यवसाय करु. तू ही राजकारणात राहू नकोस, असा सल्ला अजित पवार यांनी पार्थ पवारांना दिला, असंही शरद पवार यांनी सांगितलं. एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही, तर अजित पवार तडकाफडकी निर्णय घेतात. राजीनाम्याचा निर्णयही असाच असावा, असं मला वाटतं. मात्र पवार कुटुंबात कुटुंब प्रमुखाचा शब्द अंतिम असतो. मी कुटुंबप्रमुख म्हणून अजित पवारांशी चर्चा करणार आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मला त्यांच्या राजीनाम्याचं कारण समजू शकेल, असंही पवार यांनी स्पष्ट केले.
पुण्यात अतिवृष्टी झाल्याने परिस्थिती गंभीर झाल्याचचे मला समजले. त्यामुळे मी मुंबईतून थेट पुण्यात आलो आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post