किरण काळे कोणत्याही पदावर नव्हते; राष्ट्रवादी कॉंग्रेसचा खुलासा


एएमसी मिरर : नगर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून किरण काळे यांनी राजीनामा दिल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांच्या पदासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसकडून खुलासा करण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीमध्ये किरण काळे यांचा कुठलाही समावेश नाही. ते कोणत्याही पदावर नव्हते, असा दावा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी केला आहे.


किरण काळे हे अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असल्याचे सांगत असले, तरी ते कोणत्याही पदावर नव्हते. कुणाला नाराज करायला नको, म्हणून आम्ही आजवर कुठलाही आक्षेप घेतला नाही. मात्र, राजीनामा देण्याच्या वेळी त्यांनी पदावर असल्याचे खोटे सांगून पदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे, हे चुकीचे आहे. त्यासाठीच हा खुलासा करण्यात आला असल्याचे कपिल पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, कपिल पवार यांनी प्रदेश कार्यकारिणीची यादी माध्यमांना पाठविली असून, यात नगरमधून फक्त नगरसेवक कुमार वाकळे यांचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून उल्लेख आहे. तर युनूस शेख प्रदेश सरचिटणीस व अभिषेक खंडागळे कार्यकारिणी सदस्य आहेत.
किरण काळे यांनी सोमवारी सकाळीच पत्रकार परिषद घेऊन पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते.

Post a Comment

Previous Post Next Post