'पवारांनी मला फोडले नाही, भाजपनेच पक्षातून काढले'


एएमसी मिरर : वेब न्यूज
राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मुंडे यांचे घर फोडले, असा घणाघाती आरोप शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांनी नुकताच केला होता. यावर राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी चोख उत्तर दिले आहे. शरद पवारांनी आमचे घर फोडले नसून भाजपने आम्हाला बाहेर काढले, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी जयदत्त क्षीरसागरांचा आरोप मोडून काढला.
एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलताना धनंजय मुंडे यांनी याबाबत वक्तव्य केले आहे.धनंजय मुंडे म्हणाले की, १२ जानेवारी २०१२ ला भगवान बाबांच्या जयंतीच्या दिवशी गोपीनाथ मुंडेंनी आपल्या भावाशी असलेलं रक्ताचं नातं संपुष्टात आणलं. आणि त्यानंतर भाजपच्या एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी पक्षातून काढून टाकल्याचं जाहीर केलं. त्यामुळे शरद पवारांनी आम्हला फोडलं नसून भाजपनेच आम्हाला पक्षातून काढून टाकले, असे मुंडे म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post