चर्चा घडवून आणण्यात काहींना इंटरेस्ट : आमदार संग्राम जगताप


एएमसी मिरर : नगर
राज्यात अनेक राजकीय बदल होत आहेत. काही जण गेल्याचा अनेकांना आनंद होतो. काहींना चर्चा घडवून आणण्यात इंटरेस्ट असतो, अशा शब्दांत आमदार संग्राम जगताप यांनी शनिवारी (दि.२१) झालेल्या मेळाव्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षांतर्गत विरोधकांवर निशाणा साधला.
आमदार जगताप हे भाजप-शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. राष्ट्रवादीच्या मुलाखतींनाही त्यांनी दांडी मारली होती. मात्र, शनिवारी मेळावाल्या उपस्थित राहून त्यांनी चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
आमदार जगताप म्हणाले की, सोशल मीडिया हे चर्चेचे सोपे माध्यम आहे. अनेक चांगल्या-वाईट घडवून आणल्या जातात. त्याला काही आपल्यातले लोकही खतपाणी घालतात. अशा बाबींकडे पवार साहेबांनी कधी फार काही लक्ष दिले नाही. आम्हीही त्यांच्याच विचारांवर काम करतो. कोण काय बोलतात, याकडे लक्ष देत नाही. आपल्याला काय दिशा ठरवायची, याचा विचार आम्ही करतो. कुणी कुठेही जात असले तरी सर्वसामान्य माणूस तुमच्या विचारांबरोबर कायम आहे, असेही आमदार जगताप यावेळी म्हणाले. दरम्यान, जिल्ह्यात येत्या काळात राष्ट्रवादीसाठी काही नवीन समीकरणे पाहायला मिळणार आहेत, असे सूचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले.

Post a Comment

Previous Post Next Post