'मावळा छत्रपतींचं मन वळवू शकला नाही', उदयनराजेंबाबत अमोल कोल्हेंची खंत


एएमसी मिरर : सातारा
साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून केला जात आहे. मात्र, उदयनराजे आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. कारण पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली. जवळपास अर्धा तास चाललेल्या बैठकीनंतरही उदयनराजे यांचे मनपरिवर्तन झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मावळा छत्रपतींचं मन वळवू शकला नाही, अशी प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांना दिली आहे. त्यामुळे कोल्हे हे उदयनराजेंची मनधरणी करण्यात अयशस्वी ठरल्याचं स्पष्ट होतं आहे. तर उदयनराजे भोसले हे भाजपात जाणार हेदेखील यावरुन आता स्पष्ट झाल आहे.
उदयनराजे भोसले हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत रविवारीच त्यांचा प्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात होते. मात्र, रविवारी सोलापूर येथील महाजनादेश मेळाव्यात त्यांचा प्रवेश झालेला नाही. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उदयनराजे याच्या मनधरणीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अमोल कोल्हे यांच्या भेटीनंतरही उदयनराजे हे भाजप प्रवेशावर ठाम असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post