एएमसी मिरर : वेब न्यूज
पुणे आणि नाशिकमध्ये झालेल्या पावसाने हाहाकार उडाला आहे. त्यात आतापर्यंत १२ जणांचा बळी गेला आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री एवढे मस्तवाल झाले आहेत की त्यांना भाजप आणि निवडणूका या व्यतिरिक्त काही दिसत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन झोपलेले आहे. त्यामुळे पुणे आणि नाशिक
येथे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर
जिल्हयातील पूरपरिस्थिती असेल किंवा महालक्ष्मी एक्स्प्रेसचा प्रसंग
असेल; सगळ्या वेळी आपत्ती व्यवस्थापन निद्रिस्तावस्थेत होते. ही परिस्थिती
हाताळण्याचे काम मुख्यमंत्र्यांचे आणि पालकमंत्री यांचे आहे. पण हे लोक
मात्र दिल्लीत जावून बसले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
Post a Comment