निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार शनिवारी नगरमध्ये


एएमसी मिरर : नगर
पक्षाला लागलेल्या गळतीमुळे राजकीय अस्तित्व संकटात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला उभारी देण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार स्वत: मंगळवारपासून महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. नगर येथे शनिवारी (दि.21) शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी (दि.20) रात्रीच ते नगरला मुक्कामी येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी पवार यांच्या राज्याच्या दौर्‍याची माहिती दिली आहे. मंगळवारी (दि.17) सोलापूर येथून पवारांचा दौरा सुरू होणा आहे. राज्यात पक्षाची पडझड सुरू असल्यामुळे पक्षात असलेल्या कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी शरद पवार यांचा हा दौरा असणार आहे. त्यानुसार शनिवारी सकाळी नगरमध्ये पक्षाचे आजी-माजी आमदार, खासदार, पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक व सहकार क्षेत्रातील जाणकारांशी शरद पवार हे संवाद साधणार आहेत. दरम्यान, शहरातील आमदार संग्राम जगताप यांच्या पक्षांतराची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे या बैठकीस ते उपस्थित राहणार का? याकडे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post