वंचित भाजपला फायदा करुन देते : शरद पवार


एएमसी मिरर : वेब न्यूज
राज्यात आता एक नवीन पार्टी आली आहे. वंचित बहुजन आघाडी. ही पार्टी एकीकडे सेक्युलर आहे, असं सांगते तर दुसरीकडे हिंदुत्वावर स्वार असणाऱ्या भाजपला फायदा करून देते. वंचित ज्या पद्धतीने जात आहे, त्यांची नियत साफ नाही, जनतेने सावध रहावे, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचा मेळावा राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात झाला. वंचित बहुजन आघाडीने अनेक मतदारसंघात मागासवर्गीयांबरोबरच ओबीसी व मुस्लिमांची मते लक्षणीय प्रमाणात घेतली होती. एमआयएमचे इम्तियाज जलील हे आंबेडकर-ओवेसी युतीमुळे खासदार झाले. या पाश्र्वभूमीवर विधानसभा निवडणुकीतही वंचितमुळे मोठा फटका काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार यांनी आंबेडकर यांच्यावर निषाणा साधला आहे.
शरद पवार म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा आघाडीचा प्रस्ताव नाकारत उमेदवार उभे केले. त्यांच्या उमेदवारांनी घेतलेली मते आणि जाहीर झालेले निकाल तपासल्यास वंचितने घेतलेल्या मतांचा फायदा भाजपला झाल्याचे दिसते.
देशात यापूर्वी कधीही इतक्या टोकाचं मुस्लिमविरुद्ध वातावरण नव्हतं. मात्र अद्ययावत सरकारकडून हे वातावरण निर्माण केलं जात आहे. पाकिस्तान म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे पाकिस्तान असं वातावरण बनवलं जात आहे. पाकिस्तान आणि भारतात वेगळी फूट पाडण्याचा प्रयत्न या सरकारकडून केला जात आहे

Post a Comment

Previous Post Next Post