शरद पवार सोनिया गांधींच्या भेटीला


एएमसी मिरर : वेब न्यूज
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्याचे वृत्त असून, या दोघा नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे.
सोनिया गांधी आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात आज बैठक होणार होती. मात्र, ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे समजते. ज्योतिरादित्य शिंदे हे महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या छाननी समितीचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. २४० जागांवर समझोता झाला आहे. आता त्याला अंतिम स्वरुप देणे बाकी आहे, असे शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रेदशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांच्यासोबत चर्चाही केलेली आहे. आता शरद पवार सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले आहेत. या दोघांमध्ये नेमकी कार्य चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post