'माझ्यावर गुन्हा दाखल केला असेल तर मी स्वागत करतो'


एएमसी मिरर : वेब न्यूज
"मी कधीच कुठल्याही सहकारी बँकेचा संचालक नव्हतो, मात्र माझ्यावर गुन्हा दाखल केला असेल तर मी स्वागत करतो", अशी पहिली प्रतिक्रिया शरद पवार यांनी माध्यमांना दिली आहे. सरकारने धास्तावून ही कारवाई केली, असा आरोपही त्यांनी केला आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील हजारो कोटी रुपयांचा कर्ज वितरणात घोटाळा झाल्याचा आरोप आहे. तब्बल 25 हजार कोटींचा हा घोटाळा असून सुरिंदर अरोरा यांनी याबाबत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यात विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे यांच्यासह 76 मोठ्या नेत्यांवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्यावर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झालेत. धनंजय मुंडे, जीतेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post