निवडणुकीबाबत शरद पवार राज ठाकरेंची भूमिका जाणून घेणार?


एएमसी मिरर : वेब न्यूज
आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मनसेच्या भूमिकेबाबत स्वतः शरद पवार राज ठाकरेंशी बोलणार असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीबाबत मनसेची भूमिका अस्पष्ट असून ईडीच्या नोटीसनंतर राज ठाकरेंचा आघाडीच्या नेत्यांशी संपर्क झालेला नाही. त्यामुळे राज यांची विधानसभेत नेमकी भूमिका काय याबाबत स्वतः शरद पवार राज ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे.
ईडीच्या नोटीसआधी राज ठाकरे हे विरोधकांसह ईव्हीएमविरोधात मोर्चा काढणार होते. मात्र पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. मात्र पूर परिस्थिती पूर्वपदावर आली असताना अद्याप हा मोर्चा निघालाच नाही. त्याआधी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजप आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांना लक्क्ष्य केले होते.

Post a Comment

Previous Post Next Post