एएमसी मिरर : वेब न्यूज
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते महामुंबईचे संपर्कजाळे वाढविणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या विस्ताराचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती. महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार माजिद मेमन हे उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे . त्यामुळे भाजपच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे राज्यसभेचे खासदार असलेले माजिद मेमन उपस्थित राहिल्याने त्यांच्या पक्षांतराच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाल्या . मात्र मेमन यांनी हे वृत्त फेटाळले . राज्यकर्ता कुणीही असेल, चांगल्या कामाची आपण प्रशंसा करतो, अशी बोलकी प्रतिक्रिया त्यांनी यावेळेस दिली. तसेच मी पक्षांतर करणार नाही, मी शरद पवारांशी निष्ठा बाळगून आहे, असंही माजिद मेमन यांनी यावेळी स्पष्ट केलं.
Post a Comment