शरद पवार ईडीच्या कार्यालयात जाणार, कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहनएएमसी मिरर : वेब न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण उद्या दुपारी दोन वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहणार असल्याची माहिती दिली आहे. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह एकूण ७० जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत यांनी शुक्रवाारी आपण स्वत:हून ईडीच्या कार्यालयात हजर राहून पाहुणचार स्विकारणार असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान , शरद पवार यांनी कार्यकर्त्यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.
शरद पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “काल पत्रकार परिषदेत ठरल्याप्रमाणे मी उद्या शुक्रवार, दिनांक २७ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता, मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये तेथील अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा करण्यासाठी जात आहे”. कार्यकर्त्यांना आवाहन करताना शरद पवार यांनी, “सदर कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये. ईडी कार्यालयाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच तेथे शांतता राखली जाईल याची काळजी घ्यावी,” असं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे त्या परिसरातील वाहतुकीला व सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. पोलीस प्रशासन व इतर सर्व सरकारी यंत्रणांना आवश्यक ते सहकार्य करावे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post