सातारा लोकसभेचा निर्णय शरद पवारांच्या कोर्टात


एएमसी मिरर : वेब न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बुधवारी झाली. सातारा लोकसभेसाठी तुम्ही सांगाल तो निर्णय जिल्हयातील पदाधिकाऱ्यांना मान्य असेल, असे या बैठकीत खा.शरद पवार यांना सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सातारा लोकसभेच्या उमेदवारीच्या निर्णयाचा चेंडू आता पवारांच्या कोर्टात गेला. पृथ्वीराज चव्हाण यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र पृथ्वीराज चव्हाण हे दिल्ली येथे सोनिया गांधी यांच्याबरोबर बैठकीसाठी गेले असल्याने त्या ठिकाणीच निर्णय होण्याची शक़्यता आहे. वाईमधून आ. मकरंद पाटील , कराड उत्तर मधून आ.बाळासाहेब पाटील, कोरेगावमधून आ.शशिकांत शिंदे, पाटणमधून सत्यजीत पाटणकर, सातारा जावलीमधून दिपक पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तर फलटण, माण खटाव व कराड दक्षिणमधील उमेदवारीचा निर्णय प्रलंबित आहे.

Post a Comment

Previous Post Next Post