वाघाडीत मदतीसाठी गेलेल्या एनडीआरएफच्या १४ जवानांना रसायनाची बाधा


एएमसी मिरर : वेब न्यूज 
शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथे रासायनिक कंपनीत स्फोट झाल्याने मदतकार्यासाठी एनडीआरएफचे पथक बोलविण्यात आले होते. सदर जवान मदत कार्य करीत असतांना १४ जवानांना रसायनाची बाधा झाली. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. त्यांना उपचारासाठी सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील रूमीत केमिकल या कंपनीत स्फोट झाला. या स्फोटात १३ कामगारांचा मृत्यू झाला असून ५० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. तसेच कंपनीची इमारतही स्फोटामुळे इमारत कोसळली. याठिकाणी स्थानिक स्वयंसेवक मदतकार्य करीत होते. परंतू शासनाने मदतकार्यासाठी एनडीआरएफची टीम पाठविली. या टिममध्ये ६१ जवानांचा समावेश आहे. काल दि. १ सप्टेंबर रोजी सदर जवान मदत कार्य करीत असतांना रात्री ११.३० वाजता अकरा जवानांना रसायनाची बाधा झाली. त्यात तौसिफ खाटीक, भिया राठोड, हर्षल लोंढे, विजय ब्राम्हणे, आशिष पाटील, प्रदीप पाटील, हवालदार निलेश मोराणकर, श्री ढमाळे, सोनल चौधरी, आबा धनगर आदींचा समावेश आहे.
बाधा झालेल्या १४ जवानांना उपचारासाठी सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील तीन जवानांना अतिदक्षता गृहात उपचारासाठी दाखल केले आहे. सर्व जवानांची प्रकृतीस्थित असल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post