एएमसी मिरर : नगर
भंडारदरा पाणलोट क्षेत्रात सुरू असणार्या मुसळधार पावसामुळे निळवंडे धरणातून आज रात्री विसर्ग वाढविण्यात आला आहे. रात्री नऊ वाजता 34 हजार 125 क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवरा नदीला पूरसदृश्य स्थिति निर्माण झाली आहे.
प्रवरा नदीवरील सर्व छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत. प्रशासनाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊसाचे प्रमाण वाढल्यास निळवंडे धरणाचा विसर्ग अजून वाढविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
प्रवरा नदीत भंडारदरा धारणातून २१ हजार २४४ क्यूसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. तर ओझर बंधाऱ्यातून ९८३३ क्यूसेकने विसर्ग सुरु आहे.
दुसरीकडे नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदी पात्रात १२ हजार १६६ क्यूसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. भीमा नदीतून ४२ हजार १३८ क्यूसेक विसर्ग सुरु आहे. तर घोड़ धारणातून ६०० क्यूसेक व मुळा धारणातून २ हजार क्यूसेक विसर्ग सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Post a Comment