नगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत; उद्या पाणी नाही


एएमसी मिरर : नगर
मुळानगर, विळद येथे पावसामुळे मंगळवारी (दि.17) दुपारपासून वीजपुरवठा खंडीत झालेला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत न झाल्यामुळे बुधवारी (दि.18) नगर शहराच्या मध्यवर्ती भागात पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे मनपाकडून कळविण्यात आले आहे.
सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. वीजपुरवठा खंडीत राहिल्याने उपसा बंद होऊन पाणी वितरणाच्या टाक्या भरता आलेल्या नाहीत. त्यामुळे शहरात आज रोटेशन असलेल्या झेंडीगेट, धरती चौक, गंजबाजार, आडतेबाजार, कोठी, मंगळवार बाजार, माळीवाडा आदी भागात पाणी सोडले जाणार नाही. या भागात गुरुवारी (दि.19) पाणीपुरवठा केला जाणार आहे. तर गुरुवारी रोटेशन असलेल्या भागात शुक्रवारी (दि.20) पाणी सोडण्यात येणार असल्याचे मनपाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post