पांढरे झेंडे दाखऊन पाकिस्तानच्या लष्कराने उचलून नेली सैनिकांची प्रेतं


एएमसी मिरर : वेब न्यूज
भारतीय लष्कराच्या गोळीबारात ठार झालेल्या २ सैनिकांची प्रेत पाकिस्तानच्या लष्कराने पांढरे झेंडे दाखऊन उचलून नेली. हाजीपूर सेक्रटरमध्ये १० – ११ सप्टेंबरला युध्दविरामचे उल्लंघन करून पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला भारताच्या लष्कराने दिलेल्या प्रतिउत्तरात पाकचे २ सैनिक ठार झाले होते.
नंतर पाकिस्तानच्या लष्कराने त्यांच्या सैनिकांची प्रेतं नेण्यासाठी सीमेचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी भारताच्या लष्कराने गोळीबार केल्याने त्यांना परत जावे लागले. शेवटी पाकिस्तानच्या सैनिकांनी पांढरे झेंडे फडकवत सीमा ओलांडली आणि त्यांच्या सैनिकांची प्रेत उचलून नेली. आंतरराष्ट्रीय युद्ध नियमानुसार यावेळी भारताने पाकिस्तानच्या लष्कराला त्यांच्या सैनिकांची प्रेत उचलून नेण्यासाठी सीमा ओलांडू दिली.

Post a Comment

Previous Post Next Post