रामनाथ कोविंद यांच्या विमानाला पाकच्या हवाई हद्दीत नाकारली परवानगी


एएमसी मिरर : वेब न्यूज
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करु शकणार नाही. कोविंद यांच्या विमानाला पाकिस्तानातून उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली आहे. भारताने केलेली विनंती पाकने फेटाळली आहे. तीन देशांच्या दौऱ्यावर जाणाऱ्या रामनाथ कोविंद यांच्या विमानाला पाकिस्तानातून उड्डाणाची परवानगी द्यावी यासाठी भारताने विनंती केली होती. पण पाकिस्तानने भारताची विनंती फेटाळून लावली आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी शनिवारी ही माहिती दिली. रामनाथ कोविंद सोमवारपासून आईसलँड, स्विर्त्झलँड आणि स्लोव्हेनियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारतात घडलेल्या दहशतवादी घटनांसंदर्भात ते या देशाच्या प्रमुख नेतृत्वासोबत चर्चा करणार आहेत.
काश्मीरवरुन दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. त्यापार्श्वभूमीवर इम्रान खान यांचा या निर्णयाला पाठिंबा आहे असे कुरेशी यांनी सांगितले. बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post