अजित पवार 'सिल्व्हर ओक' वर पोहचले, पवार कुटूंबियांमध्ये चर्चा सुरू


एएमसी मिरर : वेब न्यूज
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ते अचानक नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर त्यांच्या कुटूंबियांसह राजकीय वर्तूळातही अजित पवार कुठे आहेत अशी शोधाशोध सुरू झाली होती. परंतू अजित पवार आता नुकतेच शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावर पोहचले आहेत. पुर्ण पवार कुटूंब या बंगल्यावर उपस्थित झालं आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेदेखील बंगल्यावर आले आहेत.
अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे शरद पवार यांच्या घरी जमले आहे.
शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात बैठक सुरू आहे. पवार कुटूंबियांच्या परंपरेप्रमाणे ते कुटूंबिय एकत्र बसून एखाद्या वादावर तोडगा काढतात आणि शरद पवार कुटूंब प्रमुख या नात्याने त्यावर अंतिम निर्णय देतात. काल झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतानाही शरद पवारांनी स्पष्ट केले होते की आमच्या परिवारात कुटूंब प्रमुखाचा शब्द पाळला जातो आणि कुटूंब प्रमुखाचा निर्णय अंतिम निर्णय असतो असेही शरद पवार यांनी सांगीतले आहे.
राष्ट्रवादीचे नेते सिल्ह्वर ओक बंगल्याच्या बाहेर थांबलेले आहेत तसेच बंगल्याच्या बाहेर राष्ट्रवादीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित आहेत. सगळेचजण शरद पवार अजित पवार बंगल्याच्या बाहेर येण्याची वाट पाहत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post