'की ऑफ ह्युस्टन' पुरस्काराने पंतप्रधान मोदींचा गौरव


एएमसी मिरर : वेब न्यूज 
अमेरिकेच्या ह्युस्टन शहरात हाउडी मोदी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'की ऑफ ह्युस्टन' पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. अमेरिका भारताला विश्वासू मित्र म्हणून पाहतो. अमेरिकेत भारतीय नागरिकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात असून दोन्ही देशांमधील संबंध खूप चांगले झाले आहेत. अमेरिकेच्या जडणघडणीत भारतीय लोकांनी मोठे योगदान दिले आहे, असे गौरवोद्गार अमेरिकन सरकारच्या प्रतिनिधींनी यावेळी काढले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर पोहोचले आहेत. अमेरिकेतील ह्युस्टनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन्ही नेते 'हाउडी मोदी' या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. 

Post a Comment

Previous Post Next Post